२७४. शेवट
गायीला मानलं माता
बैलासाठी सण पोळा
नागाचीही करतो पूजा
हिंदू असा हा धर्मभोळा
माणसा सारखा माणूस मात्र
मानला त्याने अस्पृश्य
हजारो वर्षे अन्यायाचं
दिसत होतं हेच दृश्य
काळानेच उगवला सूड
जन्माला आले आंबेडकर
धर्मच दिला सोडून त्यांनी
घावच घातला मुळावर
तरीही आली नाही अक्कल
दूरदृष्टीहीन धर्ममार्तंडांना
तशाच ठेवल्या जातीपाती
कुरवाळत बसले अहंगंडांना
अजून एक आला धर्म
शिवधर्म त्याचं नाव
बहुसंख्य बहुजन गेले त्यात
आणखी एक बसला घाव
धर्म जर सांगत असेल
हा श्रेष्ठ आणि तू कनिष्ठ
कोण साहिल अपमान असला
कसा राहील धर्मनिष्ठ
ज्याला होते जाणीव गुलामीची
तो करून उठतो बंड
जागा होतो स्वाभिमान त्याचा
निघून जातो न्यूनगंड
अश्याच एक एक जातील जाती
असेच घणावर बसतील घण
असं होत शेवटी फक्त
हिंदू धर्मात उरतील ब्राह्मण
--- लबाड बोका
गायीला मानलं माता
बैलासाठी सण पोळा
नागाचीही करतो पूजा
हिंदू असा हा धर्मभोळा
माणसा सारखा माणूस मात्र
मानला त्याने अस्पृश्य
हजारो वर्षे अन्यायाचं
दिसत होतं हेच दृश्य
काळानेच उगवला सूड
जन्माला आले आंबेडकर
धर्मच दिला सोडून त्यांनी
घावच घातला मुळावर
तरीही आली नाही अक्कल
दूरदृष्टीहीन धर्ममार्तंडांना
तशाच ठेवल्या जातीपाती
कुरवाळत बसले अहंगंडांना
अजून एक आला धर्म
शिवधर्म त्याचं नाव
बहुसंख्य बहुजन गेले त्यात
आणखी एक बसला घाव
धर्म जर सांगत असेल
हा श्रेष्ठ आणि तू कनिष्ठ
कोण साहिल अपमान असला
कसा राहील धर्मनिष्ठ
ज्याला होते जाणीव गुलामीची
तो करून उठतो बंड
जागा होतो स्वाभिमान त्याचा
निघून जातो न्यूनगंड
अश्याच एक एक जातील जाती
असेच घणावर बसतील घण
असं होत शेवटी फक्त
हिंदू धर्मात उरतील ब्राह्मण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा