२७३. बुरखा
जात नाही म्हणतात कधी
मेल्याशिवाय जित्याची खोड
कितीही प्रयत्न केला तरी
मन पुन्हा घेतं ओढ
मन असतं निसर्गाचं देणं
कळत नाही त्याला संयम
जाचकच भासतात मनाला
समाजाचे हे नीतिनियम
मग सुरू होतो खेळ
कधी उघड कधी लपून
पांघरून बुरखा संस्कारांचा
मन मिरवतं सभ्य म्हणून
--- लबाड बोका
जात नाही म्हणतात कधी
मेल्याशिवाय जित्याची खोड
कितीही प्रयत्न केला तरी
मन पुन्हा घेतं ओढ
मन असतं निसर्गाचं देणं
कळत नाही त्याला संयम
जाचकच भासतात मनाला
समाजाचे हे नीतिनियम
मग सुरू होतो खेळ
कधी उघड कधी लपून
पांघरून बुरखा संस्कारांचा
मन मिरवतं सभ्य म्हणून
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा