"गाय ही जर कोणाची माता असेल, तर ती बैलाची होय." ह्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सुप्रसिद्ध वचनावर आधारित
२७८. बैल
आले नवे विचार आणि
आली नवी चिकित्सा
घेता येतो शोध नव्याने
संशय जरी आला किंचितसा
कित्येक ठरले समज खोटे
कित्येक ठरले हास्यास्पद
तरीही म्हणतात त्यांचंच खरं
चढलाय त्यांना मद
कितीही धरली ओढून तरी
वेसण पडते सैल
गायीला म्हणायला माता
नाही काही मी बैल
--- लबाड बोका
२७८. बैल
आले नवे विचार आणि
आली नवी चिकित्सा
घेता येतो शोध नव्याने
संशय जरी आला किंचितसा
कित्येक ठरले समज खोटे
कित्येक ठरले हास्यास्पद
तरीही म्हणतात त्यांचंच खरं
चढलाय त्यांना मद
कितीही धरली ओढून तरी
वेसण पडते सैल
गायीला म्हणायला माता
नाही काही मी बैल
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा