२७७. मृगजळ
जितका करावा प्रयत्न जास्त
तितकं जातं जास्त दूर
संपत नाही शोध कधी
लागते मग नुसतीच हुरहुर
धावतात तरीही त्याच्या पाठी
तोच असतो एक ध्यास
सत्य काय आहे त्याचा
करत नाही कोणीच अभ्यास
अकालीच मग होऊन जाते
शिशिराशिवायही पानगळ
असंच संपून जातं आयुष्य
सुख म्हणजे ठरतं मृगजळ
--- लबाड बोका
जितका करावा प्रयत्न जास्त
तितकं जातं जास्त दूर
संपत नाही शोध कधी
लागते मग नुसतीच हुरहुर
धावतात तरीही त्याच्या पाठी
तोच असतो एक ध्यास
सत्य काय आहे त्याचा
करत नाही कोणीच अभ्यास
अकालीच मग होऊन जाते
शिशिराशिवायही पानगळ
असंच संपून जातं आयुष्य
सुख म्हणजे ठरतं मृगजळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा