२६७. फसवे
साजरे करतो ख्रिश्चन वर्ष
सर्व धर्म आम्हाला सारखे
का करावा भेदाभेद मग
का व्हावे माणुसकीला पारखे
कित्ती छान वाटतं ना
ऐकायला असे तत्त्वज्ञान मोठे
फसवेच आहे पण सारे हे
सांगणारे तर त्याहून खोटे
वाढदिवसाला कापतात केक
करतात म्हणे आणि औक्षण
कौतुक तरी कित्ती करावं
अजबच म्हणावं यांचं लक्षण
हेच साजरी करायचे ईद
जेव्हा होते मुस्लिमांचे गुलाम
आता करतात ख्रिसमस साजरा
शेवटचे होते ख्रिश्चनांचे गुलाम
अजूनही जरी येतील कोणी
करतील ह्यांना पुन्हा गुलाम
त्यांचेही सण करतील साजरे
अस्संच वर सांगतील तत्त्वज्ञान
जैन, बौद्ध, शिख इथलेच
त्यांचेही सण असतात किती
खरं सांगा करता का साजरी
अशाच आनंदाने आंबेडकर जयंती
--- लबाड बोका
साजरे करतो ख्रिश्चन वर्ष
सर्व धर्म आम्हाला सारखे
का करावा भेदाभेद मग
का व्हावे माणुसकीला पारखे
कित्ती छान वाटतं ना
ऐकायला असे तत्त्वज्ञान मोठे
फसवेच आहे पण सारे हे
सांगणारे तर त्याहून खोटे
वाढदिवसाला कापतात केक
करतात म्हणे आणि औक्षण
कौतुक तरी कित्ती करावं
अजबच म्हणावं यांचं लक्षण
हेच साजरी करायचे ईद
जेव्हा होते मुस्लिमांचे गुलाम
आता करतात ख्रिसमस साजरा
शेवटचे होते ख्रिश्चनांचे गुलाम
अजूनही जरी येतील कोणी
करतील ह्यांना पुन्हा गुलाम
त्यांचेही सण करतील साजरे
अस्संच वर सांगतील तत्त्वज्ञान
जैन, बौद्ध, शिख इथलेच
त्यांचेही सण असतात किती
खरं सांगा करता का साजरी
अशाच आनंदाने आंबेडकर जयंती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा