२६८. धर्म
सर्वांवर वचक ठेवायची
शोधली कोणीतरी युक्ती नामी
नाव दिलं धर्म त्याला
तोच आमचा म्हणतो आम्ही
काय प्यायचं काय खायचं
काय करायचं कोणी कर्म
कोणी कोणावर करावं प्रेम
हे ही ठरवत असतो धर्म
जाती पाती भेदभाव
उच्च नीच कभिन्न रंग
स्पृश्यास्पृश्य सोवळं ओवळं
धर्माचीच ही अभिन्न अंग
धर्मच ठरवत असतो नेहमी
पाप आणि पुण्याच्या कल्पना
विरोध करणाऱ्यांना करतो
नरकात टाकण्याच्या वल्गना
देव समजतो श्रेष्ठ आम्ही
पण पहा कसा उफराटा प्रकार
धर्म तर सांगत असतो
देवांवरही अधिकार
देवाचीच भीती घालून धर्म
लुडबूड करतो आयुष्यामधी
धर्माचे असतात देव पण
देवांना नसतो धर्म कधी
निसर्गत:च असतो जो तो स्वतंत्र
तेच सत्य विसरतो आम्ही
धर्म म्हणजे असतो खरंतर
स्वत:हून स्विकारलेली गुलामी
--- लबाड बोका
सर्वांवर वचक ठेवायची
शोधली कोणीतरी युक्ती नामी
नाव दिलं धर्म त्याला
तोच आमचा म्हणतो आम्ही
काय प्यायचं काय खायचं
काय करायचं कोणी कर्म
कोणी कोणावर करावं प्रेम
हे ही ठरवत असतो धर्म
जाती पाती भेदभाव
उच्च नीच कभिन्न रंग
स्पृश्यास्पृश्य सोवळं ओवळं
धर्माचीच ही अभिन्न अंग
धर्मच ठरवत असतो नेहमी
पाप आणि पुण्याच्या कल्पना
विरोध करणाऱ्यांना करतो
नरकात टाकण्याच्या वल्गना
देव समजतो श्रेष्ठ आम्ही
पण पहा कसा उफराटा प्रकार
धर्म तर सांगत असतो
देवांवरही अधिकार
देवाचीच भीती घालून धर्म
लुडबूड करतो आयुष्यामधी
धर्माचे असतात देव पण
देवांना नसतो धर्म कधी
निसर्गत:च असतो जो तो स्वतंत्र
तेच सत्य विसरतो आम्ही
धर्म म्हणजे असतो खरंतर
स्वत:हून स्विकारलेली गुलामी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा