२८२. जिद्द
सगळ्यांनाच पडली आहे
माझ्या आयुष्याची चिंता
माझ्या नुसत्या जगण्यानेच
झालाय सगळा गुंता
वीट आलाय आयुष्याचा
त्यापेक्षा मरण बरं
पैशांशिवाय किंमत नाही
हेच फक्त आहे खरं
दूर कुठेतरी शिंकते माशी
त्याचा होतो वादळ वारा
कसं पण नशिब माझं
मीच त्यात सापडतो बरा
सतत करतो उलाढाली
तरी पदरी येतं अपयश
अजून पर्यंत राहीलोय जिवंत
तेच मोठं म्हणायचं यश
लढतोय एकाकी अदृश्याशी
भविष्याची स्वप्नं पहात
लढत राहीन शेवट पर्यंत
मानणार नाही हार तहात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा