२८३. भिंती
तुमच्या आणि माझ्या मध्ये
आहेत काही अनैसर्गिक भिंती
जो तो मिरवत आहे इथे
आपल्या आपल्या धर्म जाती
साधं येत नाही जगता
माणूस म्हणून माणसाशी
अहं गर्व मिथ्थ्याचा
चिकटला आहे खोल मनाशी
कित्ती झालं असतं बरं
करता आली असती जर मात
तुम्हाला नसती तुमची आणि
मला नसती माझी जात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा