२८४. नाश
कोणीतरी शिजवतो कट
कोणालातरी येतो वास
कोणीतरी होतो सावध
कोणालातरी देतो त्रास
डावावरती पडतो डाव
तोडीस केली जाते तोड
केल्या जातात युक्त्या प्रयुक्त्या
मोडीस दिली जाते जोड
हटत नाही कुणीच मागे
आवळले जातात तसेच पाश
सुटत नाहीत गाठी मग
दोघांचाही होतो नाश
---- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा