२८०. वर्तमान
निरंतर प्रसवतं वर्तमान
भविष्याच्या उदरातून
विनाविलंब मागोमाग
फक्त शून्य अंतर सोडून
कसं असतं पण पहा
प्रसवताच होतं मृत
उरतं मग ते केवळ
कायमचं बनून भूत
अस्तित्वहीन आयुष्यहीन
वर्तमान एक शब्द फक्त
तो ही दिलाय माणसाने
बाकी सारं फक्त रिक्त
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा