२७१. ठोस उपाय
करायला हवा काहीतरी
कायमचा आणि ठोस उपाय
दुसरा काही उरला नाही
पर्याय आता त्याच्या शिवाय
कितींदा तोडत रहाणार फांद्या
घालीन म्हणतो मुळावरच घाव
घेतला नाही अजून कोणी
तोच घ्यायचाय मला ठाव
जग बदलायचं आहे मला
करतो तयारी अश्वमेधाची
धडाडून पेटवीन यज्ञकुंड
टाकीन आहुती यजुर्वेदाची
--- लबाड बोका
करायला हवा काहीतरी
कायमचा आणि ठोस उपाय
दुसरा काही उरला नाही
पर्याय आता त्याच्या शिवाय
कितींदा तोडत रहाणार फांद्या
घालीन म्हणतो मुळावरच घाव
घेतला नाही अजून कोणी
तोच घ्यायचाय मला ठाव
जग बदलायचं आहे मला
करतो तयारी अश्वमेधाची
धडाडून पेटवीन यज्ञकुंड
टाकीन आहुती यजुर्वेदाची
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा