२८५. उध्वस्त
रोज रोज फक्त समस्या
काही जुन्या काही नव्या
काहीच उपयोग होत नाही
नशिबालाही घालून शिव्या
कंटाळा येतो आयुष्याचा
म्हणून पहातो थोडी स्वप्नं
कवटाळून बसतो उराशी तरी
ती ही होतात कधी भग्न
मलाच असते खाज तशी
मोठी मोठी स्वप्नं पहायची
सवयही झालीय आता
पाहिलेली स्वप्नं उध्वस्त व्हायची
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा