२९२. चूक
पडला नाहीय दुष्काळ
पाडलाय ह्या करट्यांनी
भरलाय आता मळवट
काट्या आणि सराट्यांनी
आवडतं खूप म्हणून
चोखत राहीले तोषून
दूधच संपलं तेव्हा
रक्तच घेतलं शोषून
एक मेली तेव्हा
सरकले आणखी पुढे
संपवलं सगळं जीवन
तेही झाले मढे
तोडली मोड अनं खोडं
भागली नाही भूक
स्वत:च्याच भवितव्यावर
करून ठेवलीय चूक
--- लबाड बोका
पडला नाहीय दुष्काळ
पाडलाय ह्या करट्यांनी
भरलाय आता मळवट
काट्या आणि सराट्यांनी
आवडतं खूप म्हणून
चोखत राहीले तोषून
दूधच संपलं तेव्हा
रक्तच घेतलं शोषून
एक मेली तेव्हा
सरकले आणखी पुढे
संपवलं सगळं जीवन
तेही झाले मढे
तोडली मोड अनं खोडं
भागली नाही भूक
स्वत:च्याच भवितव्यावर
करून ठेवलीय चूक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा