२९१. काळोखाची पणती
वाटत नाही जगावसं
पण मारू नका आम्हा
मरू आम्ही असेच
मरण येईल जेव्हा
सवय सुद्धा झालीय आता
नुसतंच जगत रहायची
कितीही घडलं वाईट तरी
मूकपणे सहायची
नसतो तसे आम्ही कधी
कुणाच्याच खिजगणतीत
तेलच नसतं तसं आमच्या
काळोखाच्या पणतीत
--- लबाड बोका
वाटत नाही जगावसं
पण मारू नका आम्हा
मरू आम्ही असेच
मरण येईल जेव्हा
सवय सुद्धा झालीय आता
नुसतंच जगत रहायची
कितीही घडलं वाईट तरी
मूकपणे सहायची
नसतो तसे आम्ही कधी
कुणाच्याच खिजगणतीत
तेलच नसतं तसं आमच्या
काळोखाच्या पणतीत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा