२८६. सरकार हो
का जगावं गरीबांनी
त्यांच्याकडे तर नसतात पैसे
मरायलाही मागत नाहीत
जगत रहातात जैसे तैसे
का एवढी आस जगण्याची
काय असतं त्यांच्या आयुष्यात
दैन्य दुख्ख आणि अवहेलना
हेच परत असतं भविष्यात
पुरत नाहीत म्हणे दिवशी
सव्वीस रुपये दर माणशी
गरीब असून करतात मिजास
बघत नाहीत स्वप्नं लहानशी
राष्ट्रीय कॉंग्रेस सरकार हो
मोडा ह्यांची खोड खाशी
गुन्हेगारांना नाही तर नाही
गरीबांनाच आता द्या फाशी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा