२९६. भ्रमनिरास
शोधतो आहे तुलाच देवा
कधीचा बसलोय टपून
देव म्हणवतोस स्वत:ला तर
का बसलास लपून
जगलो आत्तापर्यंत कसाबसा
हालअपेष्टा भोगत भोगत
पावला नाहीस कधीच मला
होतो तुझ्याकडे आशेने बघत
देणेकरी आहेस तूही माझा
आत्तापर्यंत फक्त घेत आलास
ज्यांनी मांडलाय बाजार तुझा
त्यांनाच फक्त देत आलास
कर परत माझं घेतलेलं
विश्वास नाही राहीलाय आता
खूप ऐकलं होतं तुझ्याबद्दल
सगळ्या साल्या निघाल्या बाता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा