२९८. अर्पण
घेताहेत शोध अजून
लोटली युगे किती
उमगत नाही कोणालाही
कशी होते निर्मिती
जाणून आहे मी तरी
रहस्य या साऱ्याचं
नातं आहे माझ्या तुझ्यात
ग्रह आणि ताऱ्याचं
कविता माझी आहे खरंतर
फक्त एक दर्पण
तू दिलेलं देणं हे
करतो तुलाच अर्पण
--- लबाड बोका
घेताहेत शोध अजून
लोटली युगे किती
उमगत नाही कोणालाही
कशी होते निर्मिती
जाणून आहे मी तरी
रहस्य या साऱ्याचं
नातं आहे माझ्या तुझ्यात
ग्रह आणि ताऱ्याचं
कविता माझी आहे खरंतर
फक्त एक दर्पण
तू दिलेलं देणं हे
करतो तुलाच अर्पण
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा