२९९. सूर
बघतो जेव्हा तुझ्याकडे मी
लाजून तू होतेस चूर
जवळ तुझ्या आलो की
पळून जातेस दूर दूर
लागली आहे मला सुद्धा
अनामिक अशी काही हुरहुर
बरंच काही सांगून जातो
धपापणारा तुझाही ऊर
तू ही आहेस औरच तशी
औरच आहे तुझा नूर
निघतात माझ्या बासरी मधून
आता फक्त तुझेच सूर
--- लबाड बोका
बघतो जेव्हा तुझ्याकडे मी
लाजून तू होतेस चूर
जवळ तुझ्या आलो की
पळून जातेस दूर दूर
लागली आहे मला सुद्धा
अनामिक अशी काही हुरहुर
बरंच काही सांगून जातो
धपापणारा तुझाही ऊर
तू ही आहेस औरच तशी
औरच आहे तुझा नूर
निघतात माझ्या बासरी मधून
आता फक्त तुझेच सूर
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा