२८७. तरीही
मारतो मनातच मी
मोठ मोठ्या बाता मारे
मुक्यानेच भोगतो परि
आयुष्याचे भोग सारे
भरकटले हे तारू कधीचे
जिथे नेतील तिथे वारे
कळते आहे चुकलीय दिशा
आहेत अजून तिथेच तारे
नाही अजूनी कुठेच थार
बंद अजूनी खिडक्या दारे
तरीही तेच देतो नारे
आणि तेच वाहतो भारे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा