२८८. भूमिका
वठवू पहातो भूमिका मी
सगळ्याच घोटून घोटून
आडातच नाही मुळात तर
पोहऱ्यात तरी येणार कुठून
बनू पहातो मेहमीच मी
एक आदर्श मुलगा
तरी कधी घडते चूक
ठरतो मग कूळ बुडवा
प्रयत्न करतो मनापासून
चांगला भाऊ बनण्याचा
प्रसंग येतो तरी कधी
नाते संबंध ताणण्याचा
तसा खरंतर असतो मी
एक प्रेमळ नवरा
घसरतो तरी पाय कधी
होतो बदफैली भवरा
वागतो मी मुलांशीही
बनून कठोर बाप
दिसत नाही जगाला पण
मनाला होणारा ताप
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा