२८९. भेट
आपल्या पहिल्या भेटीला
लोटलीत कित्येक वर्ष
आठवतोय अजून मला
पहिला हळूवार स्पर्श
तापले होते कान माझे
झाला होता उष्ण श्वास
तेव्हा सुद्धा होता तुझा
माझ्यावरती पूर्ण विश्वास
तुझीही अवस्था होती तशीच
एकांतच होता तसा
झाले या देहीचे त्या देही
आत्माच आत्म्याला भेटला जसा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा