३०७. नाइलाज
काही गोष्टी आपण आयुष्यात
देतो अर्धवट सोडून
मन असतं गुंतलेलं तरी
आपणच टाकतो तोडून
दुख्ख रहातंच तरीही तसंच
अंतर्मनात दडून
येतं उफाळून अचानक जेव्हा
मोकळं होतो रडून
इलाज नसतो दुसरा काही
वागावंच लागतं तसं
सभ्य आहोत आपण ना
मग जगावंच लागतं असं
--- लबाड बोका
काही गोष्टी आपण आयुष्यात
देतो अर्धवट सोडून
मन असतं गुंतलेलं तरी
आपणच टाकतो तोडून
दुख्ख रहातंच तरीही तसंच
अंतर्मनात दडून
येतं उफाळून अचानक जेव्हा
मोकळं होतो रडून
इलाज नसतो दुसरा काही
वागावंच लागतं तसं
सभ्य आहोत आपण ना
मग जगावंच लागतं असं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा