३०९. निरूपयोगी
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
म्हणे देवपण येत नाही
माणसं मरतात उपाशी तरी
मदतीला देवपण येत नाही
देवाचं अवडंबर माजवणारे
आयतं खात जगतात मस्त
कष्ट करणाऱ्यांचा मात्र होतो
उरी फुटून अकाली अस्त
देव असतात म्हणे स्वर्गात
ते ही जाणार स्वर्गात म्हणे
दोघांचाही उपयोग नाही
कष्टकऱ्यांचे तर मातीमोल जिणे
--- लबाड बोका
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
म्हणे देवपण येत नाही
माणसं मरतात उपाशी तरी
मदतीला देवपण येत नाही
देवाचं अवडंबर माजवणारे
आयतं खात जगतात मस्त
कष्ट करणाऱ्यांचा मात्र होतो
उरी फुटून अकाली अस्त
देव असतात म्हणे स्वर्गात
ते ही जाणार स्वर्गात म्हणे
दोघांचाही उपयोग नाही
कष्टकऱ्यांचे तर मातीमोल जिणे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा