३१३. नशिबाची ठेव
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
म्हणे देवपण येत नाही
घाव सोसूनही पाटा वरवंट्याचा
देव कधी होत नाही
आकार महत्वाचा म्हणाल तर
ते ही नाही कारण एकमेव
ओबड धोबड दगडाचाही
शेंदूर फासून होतो देव
चित्र देवाचं काढलं तरी
कुणीही सहज पडतं पाया
अंगी देवत्व नसूनही
बुवा जवळ जमतात बाया
म्हणून म्हणतो लागतं नशिब
नशिबाचीच असावी लागते ठेव
नशिब असेल साथीला तर
दगडाचाही होतो देव
--- लबाड बोका
टाकीचे घाव सोसल्याशिवाय
म्हणे देवपण येत नाही
घाव सोसूनही पाटा वरवंट्याचा
देव कधी होत नाही
आकार महत्वाचा म्हणाल तर
ते ही नाही कारण एकमेव
ओबड धोबड दगडाचाही
शेंदूर फासून होतो देव
चित्र देवाचं काढलं तरी
कुणीही सहज पडतं पाया
अंगी देवत्व नसूनही
बुवा जवळ जमतात बाया
म्हणून म्हणतो लागतं नशिब
नशिबाचीच असावी लागते ठेव
नशिब असेल साथीला तर
दगडाचाही होतो देव
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा