३१२. जुगार
एखाद दुसरा कधीतरी
जिंकत असतो लॉटरी जुगार
त्यांच्याकडेच पाहून मग
बाकीचे गमवतात अख्खा पगार
तसंच आहे आयुष्याचंही
एखाद दुसरा होतो यशस्वी
गरीब बिच्चारे बाकीचे मग
रेटतात आपली आयुष्य फसवी
खेळता खेळता जुगार आयुष्याचा
संपून जातं आयुष्यं कधी
समजत नाही कधीच मग
काय मिळवलंय आयुष्यामधी
--- लबाड बोका
एखाद दुसरा कधीतरी
जिंकत असतो लॉटरी जुगार
त्यांच्याकडेच पाहून मग
बाकीचे गमवतात अख्खा पगार
तसंच आहे आयुष्याचंही
एखाद दुसरा होतो यशस्वी
गरीब बिच्चारे बाकीचे मग
रेटतात आपली आयुष्य फसवी
खेळता खेळता जुगार आयुष्याचा
संपून जातं आयुष्यं कधी
समजत नाही कधीच मग
काय मिळवलंय आयुष्यामधी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा