३१९. मुक्त
नाही कुठला धर्म माझा
नाही कुठली जात
मानवतेच्या आड येणारी
टाकून दिली मी कात
साचली होती मनावरती
मतामतांची घाण
विवेकाचा लावून साबण
केले निर्मळ स्नान
टाकले उतरवून एकदाचे
परंपरांचे ओझे
झाले आहे मुक्त आता
सारे आभाळ माझे
--- लबाड बोका
नाही कुठला धर्म माझा
नाही कुठली जात
मानवतेच्या आड येणारी
टाकून दिली मी कात
साचली होती मनावरती
मतामतांची घाण
विवेकाचा लावून साबण
केले निर्मळ स्नान
टाकले उतरवून एकदाचे
परंपरांचे ओझे
झाले आहे मुक्त आता
सारे आभाळ माझे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा