३२०. भक्ती
करावी लागते सारखी
देवाची सुद्धा हाजी
होत नाही त्याशिवाय
तो सुद्धा राजी
करावी लागते भाटगिरी
म्हणावं लागतं राया
गुंडाळून सगळा स्वाभिमान
पडावं लागतं पाया
पदर पसरून देवापुढे
मागवी लागते भिक
वाईट वाटून घ्यायचं नसतं
नाही मिळाली तरी ठीक
आहे खरं तर लाचारी ही
पण म्हणतात तिला भक्ती
हेच करण्यात घालवतात वाया
पामर सारी शक्ती
--- लबाड बोका
करावी लागते सारखी
देवाची सुद्धा हाजी
होत नाही त्याशिवाय
तो सुद्धा राजी
करावी लागते भाटगिरी
म्हणावं लागतं राया
गुंडाळून सगळा स्वाभिमान
पडावं लागतं पाया
पदर पसरून देवापुढे
मागवी लागते भिक
वाईट वाटून घ्यायचं नसतं
नाही मिळाली तरी ठीक
आहे खरं तर लाचारी ही
पण म्हणतात तिला भक्ती
हेच करण्यात घालवतात वाया
पामर सारी शक्ती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा