३१८. उपहास
असोत कितीही जाती धर्म
माणसांचे खरे दोनच प्रकार
मुठभर असतात स्वाभिमानी
बाकी सारे असतात लाचार
लाचारांचंच पण फावतं नेहमी
त्यांचंच असतं पारडं जड
स्वाभिमानी रहातात उपेक्षित
होत असते त्यांची परवड
स्वाभिमान्यांनीच तरीही
घडवलाय सारा इतिहास
लाचार गेले विस्मृतीत कधीच
इतिहासानेच केला त्यांचा उपहास
--- लबाड बोका
असोत कितीही जाती धर्म
माणसांचे खरे दोनच प्रकार
मुठभर असतात स्वाभिमानी
बाकी सारे असतात लाचार
लाचारांचंच पण फावतं नेहमी
त्यांचंच असतं पारडं जड
स्वाभिमानी रहातात उपेक्षित
होत असते त्यांची परवड
स्वाभिमान्यांनीच तरीही
घडवलाय सारा इतिहास
लाचार गेले विस्मृतीत कधीच
इतिहासानेच केला त्यांचा उपहास
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा