३०१. उत्सव
अमृत प्राशन करून सुद्धा
संपून गेले सगळे हरी
का जगू आयुष्य मग
रडत रडत मी तरी
केली कितीही शिकस्त जरी
कुडी अशी जपण्याची
आहेत कारणं हजारो तशी
आयुष्य कधीही संपण्याची
म्हणून जगतो रोज रोज
जगण्याचाच उत्सव साजरा करत
हा जन्म आणि हे आयुष्य
मिळणार नाही कधी परत
--- लबाड बोका
अमृत प्राशन करून सुद्धा
संपून गेले सगळे हरी
का जगू आयुष्य मग
रडत रडत मी तरी
केली कितीही शिकस्त जरी
कुडी अशी जपण्याची
आहेत कारणं हजारो तशी
आयुष्य कधीही संपण्याची
म्हणून जगतो रोज रोज
जगण्याचाच उत्सव साजरा करत
हा जन्म आणि हे आयुष्य
मिळणार नाही कधी परत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा