३१७. नरक
होतोच कधी मी धर्मात तुमच्या
तर घालवताय मला बाहेर
तरीही आहे मी तुमच्यापैकीच
देतो तुम्हाला घरचा आहेर
फसवणुकीचे धंदे तुमचे
थोतांड तुमचं ते कर्मकांड
जाणून आहे रहस्य मी
जाणून आहे सारं ब्रह्मांड
ओरडून सांगतो जगाला मी
पडत नाही मला फरक
घाबरवता घालून ज्याची भीती
तुम्हीच आहात तो नरक
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा