३२२. बरंच झालं
केलं असतं खूप प्रेम
मनापासून तुझ्यावर
खोटं वाटेल तुला पण
विश्वास ठेव माझ्यावर
जपलं असतं नेहमी तुला
नाजूक फुलासारखं
केलं नसतं कधी तुला
सुखाला गं पारखं
जगलो असतो आयुष्य
समजून घेऊन तुला
तुझ्या माझ्या संसाराचा
झुलवला असता झुला
काढलं असतं म्हातारपण
एकमेकांच्या साथीनं
केली असती सेवा शुश्रूषा
तुझी मी जातीनं
तू गेल्याचं दुख्ख मग
सोसलं नसतं गं मला
बरंच झालं तसं खरंतर
नाहीच मिळालीस तू मला
--- लबाड बोका
केलं असतं खूप प्रेम
मनापासून तुझ्यावर
खोटं वाटेल तुला पण
विश्वास ठेव माझ्यावर
जपलं असतं नेहमी तुला
नाजूक फुलासारखं
केलं नसतं कधी तुला
सुखाला गं पारखं
जगलो असतो आयुष्य
समजून घेऊन तुला
तुझ्या माझ्या संसाराचा
झुलवला असता झुला
काढलं असतं म्हातारपण
एकमेकांच्या साथीनं
केली असती सेवा शुश्रूषा
तुझी मी जातीनं
तू गेल्याचं दुख्ख मग
सोसलं नसतं गं मला
बरंच झालं तसं खरंतर
नाहीच मिळालीस तू मला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा