३२३. धिक्कार
जगायचं होतं मनसोक्त मला
पण घातलंत तुम्ही बंधन
जो जो भेटला ऐरा गैरा
करायला लावलंत वंदन
चांगले भेटले क्वचित कोणी
वाईटच भेटले जास्त
बोलू शकलो नाही कधी
तुमच्यामुळेच मी रास्त
माराव्या लागल्या इच्छा आकांक्षा
मारावं लागलं मन
केलात तुम्ही विचार सदा
काय बोलतील जन
तसाच राहिलो जगत मी
गेलो असतो मरून
काय मिळवलंत सांगा तुम्ही
असा अन्याय करून
आयुष्य माझं होतं पण
नव्हता माझा अधिकार
सहन करणार नाही आता
करतो तुमचा धिक्कार
--- लबाड बोका
जगायचं होतं मनसोक्त मला
पण घातलंत तुम्ही बंधन
जो जो भेटला ऐरा गैरा
करायला लावलंत वंदन
चांगले भेटले क्वचित कोणी
वाईटच भेटले जास्त
बोलू शकलो नाही कधी
तुमच्यामुळेच मी रास्त
माराव्या लागल्या इच्छा आकांक्षा
मारावं लागलं मन
केलात तुम्ही विचार सदा
काय बोलतील जन
तसाच राहिलो जगत मी
गेलो असतो मरून
काय मिळवलंत सांगा तुम्ही
असा अन्याय करून
आयुष्य माझं होतं पण
नव्हता माझा अधिकार
सहन करणार नाही आता
करतो तुमचा धिक्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा