३११. श्रद्धा
लोटलाय किती काळ
रोज बोलतो नवस
आता तरी देवा मला
दाखव सुखाचे दिवस
करतो खूप काबाड कष्ट
निढळाचा मी गाळतो घाम
अनपेक्षित येतात अडचणी काही
धुवून जातो सगळा दाम
अजूनही आहे देवा माझा
तुझ्यावरती अपार विश्वास
तूच घालशील देवा मला
पोटापुरते दोन घास
वाट तरी पाहू किती
करू नकोस अपेक्षाभंग
निष्ठा माझी तुझ्यावरची
आहे अजूनही तशीच अभंग
ते हसत असतात मला
म्हणतात देव नाही जगात
असाच जाणार म्हणतात मी
देव देव करत ढगात
--- लबाड बोका
लोटलाय किती काळ
रोज बोलतो नवस
आता तरी देवा मला
दाखव सुखाचे दिवस
करतो खूप काबाड कष्ट
निढळाचा मी गाळतो घाम
अनपेक्षित येतात अडचणी काही
धुवून जातो सगळा दाम
अजूनही आहे देवा माझा
तुझ्यावरती अपार विश्वास
तूच घालशील देवा मला
पोटापुरते दोन घास
वाट तरी पाहू किती
करू नकोस अपेक्षाभंग
निष्ठा माझी तुझ्यावरची
आहे अजूनही तशीच अभंग
ते हसत असतात मला
म्हणतात देव नाही जगात
असाच जाणार म्हणतात मी
देव देव करत ढगात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा