३०४. गरीब
ओढलेल्या चेहऱ्यावर
केविलवाणा भाव
तुम्ही जे ठेवाल ते
तेच माझं नाव
नजरेमध्ये शून्य
काही नाही हातात
जितेपणीच गोवऱ्या
मसणामध्ये जातात
एक फुटकं भांडं
आणि फुटकं नशिब
काय मागू देवाकडे
तो ही आहे गरीब
--- लबाड बोका
ओढलेल्या चेहऱ्यावर
केविलवाणा भाव
तुम्ही जे ठेवाल ते
तेच माझं नाव
नजरेमध्ये शून्य
काही नाही हातात
जितेपणीच गोवऱ्या
मसणामध्ये जातात
एक फुटकं भांडं
आणि फुटकं नशिब
काय मागू देवाकडे
तो ही आहे गरीब
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा