३२४. उपरती
संपलेच आहे सारे
राहिले शेवटी शून्य
मानिले जे मी पाप
तेच निघाले पुण्य
लागलो असा कसा मी
चुकीच्या लोकांच्या नादी
कळलाच नव्हता ज्यांना
तो अनंत आणि अनादी
कुठे आहे तो स्वर्ग
धिक्कारितो मी हो त्याला
ही मातीच मजला प्यारी
नको मज अमृत प्याला
--- लबाड बोका
संपलेच आहे सारे
राहिले शेवटी शून्य
मानिले जे मी पाप
तेच निघाले पुण्य
लागलो असा कसा मी
चुकीच्या लोकांच्या नादी
कळलाच नव्हता ज्यांना
तो अनंत आणि अनादी
कुठे आहे तो स्वर्ग
धिक्कारितो मी हो त्याला
ही मातीच मजला प्यारी
नको मज अमृत प्याला
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा