३३०. पाखंडी
करीत नाही मी कधी
भक्तीचे प्रदर्शन
देवळातही जाऊन कधी
घेत नाही दर्शन
करत नाही वारी कधी
करत नाही उपवास
दाखवत नाही कधीच मी
देवालाही धूप वास
करत नाही होम हवन
घालत नाही प्रदक्षिणा
देत नाही म्हणूनच मी
कोणालाही दक्षिणा
घालत नाही गाऱ्हाणे मी
बोलत नाही नवस
सगळेच दिवस सारखे मला
पौर्णिमा असो की अवस
फोडत नाही नारळ मी
देत नाही बळी
धरत नाही उचलून कधी
देवाचीही तळी
जोडत नाही हात कधी
पडत नाही पाया
गेले म्हणतात सगळेचजण
आयुष्य माझे वाया
देव आहे जिथे तिथे
कुठे कुठे नी काय करू
ठरतोय ना मी पाखंडी
ठरतोय तर देत ठरू
--- लबाड बोका
करीत नाही मी कधी
भक्तीचे प्रदर्शन
देवळातही जाऊन कधी
घेत नाही दर्शन
करत नाही वारी कधी
करत नाही उपवास
दाखवत नाही कधीच मी
देवालाही धूप वास
करत नाही होम हवन
घालत नाही प्रदक्षिणा
देत नाही म्हणूनच मी
कोणालाही दक्षिणा
घालत नाही गाऱ्हाणे मी
बोलत नाही नवस
सगळेच दिवस सारखे मला
पौर्णिमा असो की अवस
फोडत नाही नारळ मी
देत नाही बळी
धरत नाही उचलून कधी
देवाचीही तळी
जोडत नाही हात कधी
पडत नाही पाया
गेले म्हणतात सगळेचजण
आयुष्य माझे वाया
देव आहे जिथे तिथे
कुठे कुठे नी काय करू
ठरतोय ना मी पाखंडी
ठरतोय तर देत ठरू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा