३२९. छंद
कित्ती सुंदर आकार
कित्ती सुंदर रंग
पाहूनच होतं मग
पुलकित सारं अंग
कित्ती नाजूक ठेवण
कित्ती कोमल स्पर्श
आपोआपच होतो बघ
मनालाही हर्ष
कित्ती सुंदर रूप
कित्ती मादक गंध
का होणार नाही कोणी
प्रेमामध्ये मग अंध
आठवण तरी झाली तरी
व्हायला होतं धुंद
लागला आहे म्हणूनच
मलाही तोच छंद
--- लबाड बोका
कित्ती सुंदर आकार
कित्ती सुंदर रंग
पाहूनच होतं मग
पुलकित सारं अंग
कित्ती नाजूक ठेवण
कित्ती कोमल स्पर्श
आपोआपच होतो बघ
मनालाही हर्ष
कित्ती सुंदर रूप
कित्ती मादक गंध
का होणार नाही कोणी
प्रेमामध्ये मग अंध
आठवण तरी झाली तरी
व्हायला होतं धुंद
लागला आहे म्हणूनच
मलाही तोच छंद
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा