३३४. सलाम
काही हजार वर्षांपूर्वी
जिंकलं होतं त्यांनी आम्हाला
त्यांचीच पूजा करण्यासाठी
जातो दर्शन धामाला
कोण कुठचे होते ते
लादली त्यांनी त्यांची संस्कृती
आम्ही झालो गुलाम त्यांचे
विसरून गेलो मूळ प्रकृती
त्यांनाच मानतो पूर्वज आता
त्यांनाच मानतो आता देव
जे ऐकत नाही त्यांना
त्यांचंच आता घालतो भेव
त्यांना मरून लोटली युगं
आम्ही अजून आहोत गुलाम
संस्कृती आणि परंपरेला
गुलामांचा ललाम सलाम
--- लबाड बोका
काही हजार वर्षांपूर्वी
जिंकलं होतं त्यांनी आम्हाला
त्यांचीच पूजा करण्यासाठी
जातो दर्शन धामाला
कोण कुठचे होते ते
लादली त्यांनी त्यांची संस्कृती
आम्ही झालो गुलाम त्यांचे
विसरून गेलो मूळ प्रकृती
त्यांनाच मानतो पूर्वज आता
त्यांनाच मानतो आता देव
जे ऐकत नाही त्यांना
त्यांचंच आता घालतो भेव
त्यांना मरून लोटली युगं
आम्ही अजून आहोत गुलाम
संस्कृती आणि परंपरेला
गुलामांचा ललाम सलाम
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा