३३५. नाद
ती पहाते माझ्याकडे
मीच टाळतो नजर
जिथे पहावं तिथे
असते ती हजर
वागतो मी असा तरी
सोडत नाही पिच्छा
जाणून आहे मी सुद्धा
तिच्या मनीची इच्छा
मानलं पाहिजे तिला
देतो मनात दाद
कोणी पहात नसताना
हसून देतो प्रतिसाद
माझ्याही येतं मनात पण
उमटतील लगेच पडसाद
अशा संसारी बायकांचा
नाहीच बरा हा नाद
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा