३२७. आवाहन
करू नका जयजयकार नुसता
दाखवू नका नुसताच विभ्रम
शिवरायच जर असतील आदर्श
त्यांच्या सारखाच करा पराक्रम
शिवरायांचे गाऊन पोवाडे
होता येईल फक्त शाहीर
शिवरायांसारखं व्हायचं की नाही
ते ही एकदा करा जाहीर
राम होता आदर्श शिवरायांचा
पण झाले नाहीत ते रामदास
कृष्णनीतीचा करून वापर
संपवला महाराष्ट्राचा वनवास
नाव शिवरायांचं घेऊन सदा
होऊ पहात असाल मोठे
शेपूट घालून जगणाऱ्यांनो
जळो तुमचे लक्षण खोटे
शिवरायांवेळी होती जशी
तशीच आहे आजही स्थिती
असाल वारस शिवरायांचे तर
करा काहीतरी ठोस कृती
बोला बोला आहात का तयार
साधा संपर्क खाजगीमध्ये
नाव तुमचं देईन कोरून
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये
--- लबाड बोका
करू नका जयजयकार नुसता
दाखवू नका नुसताच विभ्रम
शिवरायच जर असतील आदर्श
त्यांच्या सारखाच करा पराक्रम
शिवरायांचे गाऊन पोवाडे
होता येईल फक्त शाहीर
शिवरायांसारखं व्हायचं की नाही
ते ही एकदा करा जाहीर
राम होता आदर्श शिवरायांचा
पण झाले नाहीत ते रामदास
कृष्णनीतीचा करून वापर
संपवला महाराष्ट्राचा वनवास
नाव शिवरायांचं घेऊन सदा
होऊ पहात असाल मोठे
शेपूट घालून जगणाऱ्यांनो
जळो तुमचे लक्षण खोटे
शिवरायांवेळी होती जशी
तशीच आहे आजही स्थिती
असाल वारस शिवरायांचे तर
करा काहीतरी ठोस कृती
बोला बोला आहात का तयार
साधा संपर्क खाजगीमध्ये
नाव तुमचं देईन कोरून
महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा