३३६. नादुरूस्त
केली कर्मकांडं
कमवत राहिलो पुण्य
हिशोब झाला जेव्हा
बाकी निघाली शून्य
आचरलो धर्माने नेहमी
केला माणसांत फरक
मिळवायचा होता स्वर्ग
पण मिळाला नरक
सत्य समजलं जेव्हा
झाली पुरती उपरती
जन्मही नव्हता पुढचा
करायला चुकांची दुरूस्ती
--- लबाड बोका
केली कर्मकांडं
कमवत राहिलो पुण्य
हिशोब झाला जेव्हा
बाकी निघाली शून्य
आचरलो धर्माने नेहमी
केला माणसांत फरक
मिळवायचा होता स्वर्ग
पण मिळाला नरक
सत्य समजलं जेव्हा
झाली पुरती उपरती
जन्मही नव्हता पुढचा
करायला चुकांची दुरूस्ती
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा