३३७. नशा
पिंपळावरती अजून कोकीळ
घेतो तशीच तान
तुझ्या नावाचं ठेवलंय अजून
जपून पिंपळपान
तू दिलेलं मोरपीस अजून
फिरवत बसतो गालावर
तोच हळूवार शहारा अजून
अनुभवतो त्याच तालावर
पहात बसतो अजून मी
गुलाब वहीतला सुकलेला
आठवतो अजून तुझा
चेहरा लाजून झुकलेला
आहे अजून तुझाच मी
तुझ्याविनाच झालीय दशा
जगवते आहे अजून मला
तुझ्या आठवणींचीच नशा
--- लबाड बोका
पिंपळावरती अजून कोकीळ
घेतो तशीच तान
तुझ्या नावाचं ठेवलंय अजून
जपून पिंपळपान
तू दिलेलं मोरपीस अजून
फिरवत बसतो गालावर
तोच हळूवार शहारा अजून
अनुभवतो त्याच तालावर
पहात बसतो अजून मी
गुलाब वहीतला सुकलेला
आठवतो अजून तुझा
चेहरा लाजून झुकलेला
आहे अजून तुझाच मी
तुझ्याविनाच झालीय दशा
जगवते आहे अजून मला
तुझ्या आठवणींचीच नशा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा