३४०. माणूस
तू असशील हिंदू तर
मी ही असेन हिंदू
तुझ्यासोबत मी ही वंदीन
गंगा यमुना सिंधू
तू असशील मुसलमान तर
मी ही असेन मुसलमान
मी ही पडेन नमाज तेव्हा
ऐकून सुरेल अजान
तू असशील बौद्ध तर
मी ही असेन बौद्ध
मी ही जाईन शरण बुद्धाला
आणि होईन प्रबुद्ध
तू असशील ख्रिश्चन तर
मी ही असेन ख्रिश्चन
तुझ्यासोबत मी ही जगेन
प्रभू येशूचं मिशन
पण तू जेव्हा नसशील तेव्हा
मी मात्र असेन माणूस
निष्ठा तुझी धर्मावरची
कधीही नको ताणूस
--- लबाड बोका
तू असशील हिंदू तर
मी ही असेन हिंदू
तुझ्यासोबत मी ही वंदीन
गंगा यमुना सिंधू
तू असशील मुसलमान तर
मी ही असेन मुसलमान
मी ही पडेन नमाज तेव्हा
ऐकून सुरेल अजान
तू असशील बौद्ध तर
मी ही असेन बौद्ध
मी ही जाईन शरण बुद्धाला
आणि होईन प्रबुद्ध
तू असशील ख्रिश्चन तर
मी ही असेन ख्रिश्चन
तुझ्यासोबत मी ही जगेन
प्रभू येशूचं मिशन
पण तू जेव्हा नसशील तेव्हा
मी मात्र असेन माणूस
निष्ठा तुझी धर्मावरची
कधीही नको ताणूस
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा