३४२. खडे बोल
त्यांना वाटतं कळत नाही
पण कळलाय त्यांचा डाव
सत्तेसाठी घालू लागलेत
माणुसकीवरच घाव
मुखी जयघोष शिवरायांचा
अन् कृती नेमकी उलटी
जाती धर्मात उभारताहेत
भेदाभेदाच्या भिंती
शिवराय असते आज तर
उडवली असती मुंडकी
मुळातूनच उखडली असती
विचारधाराच सडकी
कितीही करा खोटा प्रचार
सुनावतो बोल खडे
महाराष्ट्र जाणतो शिवरायांना
गिरविल त्यांचेच धडे
--- लबाड बोका
त्यांना वाटतं कळत नाही
पण कळलाय त्यांचा डाव
सत्तेसाठी घालू लागलेत
माणुसकीवरच घाव
मुखी जयघोष शिवरायांचा
अन् कृती नेमकी उलटी
जाती धर्मात उभारताहेत
भेदाभेदाच्या भिंती
शिवराय असते आज तर
उडवली असती मुंडकी
मुळातूनच उखडली असती
विचारधाराच सडकी
कितीही करा खोटा प्रचार
सुनावतो बोल खडे
महाराष्ट्र जाणतो शिवरायांना
गिरविल त्यांचेच धडे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा