३४५. नि:शब्द
अक्षर म्हणजे पाकळी आणि
शब्द म्हणजे सुंदर फूल
त्या शब्दफुलांच्या सौंदर्याचीच
पडली आहे मला भूल
ध्यानी मनी स्वप्नी आता
दिसतात मला शब्द फक्त
शब्दांतूनच करतो मी
शब्दांवरचं प्रेम व्यक्त
शब्द शब्द घेऊन मी
शब्दफुलांचा गुंफतो हार
शब्दांचाच करून अभिषेक
शब्दांचीच वर धरतो धार
शब्दमय मी झालोय आता
शब्दांचाच घेतो श्वास
होईन जेव्हा नि:शब्द मी
शब्दच माझे उरतील खास
--- लबाड बोका
अक्षर म्हणजे पाकळी आणि
शब्द म्हणजे सुंदर फूल
त्या शब्दफुलांच्या सौंदर्याचीच
पडली आहे मला भूल
ध्यानी मनी स्वप्नी आता
दिसतात मला शब्द फक्त
शब्दांतूनच करतो मी
शब्दांवरचं प्रेम व्यक्त
शब्द शब्द घेऊन मी
शब्दफुलांचा गुंफतो हार
शब्दांचाच करून अभिषेक
शब्दांचीच वर धरतो धार
शब्दमय मी झालोय आता
शब्दांचाच घेतो श्वास
होईन जेव्हा नि:शब्द मी
शब्दच माझे उरतील खास
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा