३४६. लढाई
बुडाला तर बुडू दे सूर्य
उद्या उगवेल परत
अंधाराला भिऊन कधी
प्रकाश नसतो हरत
रडावसं वाटलं तर रडून घे
रडलेलं असतं बरं
उद्या पुन्हा लढायचंय
हेच असतं खऱं
करू नकोस अपेक्षा कधी
कोणाच्याच मदतीची
ज्याची त्याने लढायची असते
लढाई आपल्या अस्तित्वाची
--- लबाड बोका
बुडाला तर बुडू दे सूर्य
उद्या उगवेल परत
अंधाराला भिऊन कधी
प्रकाश नसतो हरत
रडावसं वाटलं तर रडून घे
रडलेलं असतं बरं
उद्या पुन्हा लढायचंय
हेच असतं खऱं
करू नकोस अपेक्षा कधी
कोणाच्याच मदतीची
ज्याची त्याने लढायची असते
लढाई आपल्या अस्तित्वाची
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा