३४९. आश्वासन
अंधारात तर जाते नेहमी
सावलीही सोडून साथ
पण मी सोडणार नाही कधी
धरलेला तुझा हात
कायम देईन साथ तुला
पाडणार नाही एकटं
येवोत कितीही दुख्खं आणि
येवोत कितीही संकटं
लक्षात ठेव नेहमीच तू
एक गोष्ट साधी
आलीच तशी वेळ तर
मी जाईन आधी
--- लबाड बोका
अंधारात तर जाते नेहमी
सावलीही सोडून साथ
पण मी सोडणार नाही कधी
धरलेला तुझा हात
कायम देईन साथ तुला
पाडणार नाही एकटं
येवोत कितीही दुख्खं आणि
येवोत कितीही संकटं
लक्षात ठेव नेहमीच तू
एक गोष्ट साधी
आलीच तशी वेळ तर
मी जाईन आधी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा