३५०. अपूर्ण पुरूष
आज्या पणज्या खापर पणज्या
त्यांचाच तर मी वंश
आहे म्हणून माझ्यामध्येही
स्त्रीचा सुद्धा अंश
सुसंस्कारांनी केलं आहे
आईने माझं पोषण
आवडत नाही केलेलं मला
स्त्रियांचं कोणी शोषण
बहिणी पुतण्या भाच्या माझ्या
आहेत सगळ्या स्त्रिया
अशीच कोणी एक स्त्री
असेल माझी प्रिया
मुली सुना नाती माझ्या
असतील लाडक्या सगळ्या
मानणार नाही मी त्यांना
माझ्यापासून वेगळ्या
करणार नाही अन्याय स्त्रियांवर
मानणार नाही मन
मला सुद्धा आहेतच ना
अविकसित दोन स्तन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा