३५२. गर्दी
कसली रे ही गर्दी देवा
फुटलंय जणू कोड
भक्तीच्या प्रदर्शनाची
नुसतीच चढाओढ
पैसा आणि प्रसिद्धीची
देतात वर जोड
मिरवतात मोठेपणा
त्याला नाही तोड
कामं धामं सोडूनी हे
नाचतात घोडं
येईल का सांग कधी
दगडाला मोड
आहेस तरी का तू आधी
पडलंय मला कोडं
असशील तर घाल त्यांच्या
मडक्यात ज्ञान थोडं
--- लबाड बोका
कसली रे ही गर्दी देवा
फुटलंय जणू कोड
भक्तीच्या प्रदर्शनाची
नुसतीच चढाओढ
पैसा आणि प्रसिद्धीची
देतात वर जोड
मिरवतात मोठेपणा
त्याला नाही तोड
कामं धामं सोडूनी हे
नाचतात घोडं
येईल का सांग कधी
दगडाला मोड
आहेस तरी का तू आधी
पडलंय मला कोडं
असशील तर घाल त्यांच्या
मडक्यात ज्ञान थोडं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा