३५३. दृष्टिकोन
घटना एकच असते पण
अर्थ दोन असतात तीत
एकाची असते हार जी
तिच दुस-याची असते जीत
भुकेल्याच्या दातावरती
मारत नाही कोणी शित
श्रीमंताला अहेर मोठा
हीच जगाची आहे रित
सुख दुख्खाने भरलेलं आयुष्य
कोणी जगतं भीत भीत
आयुष्य तेच असतं पण
कोणी मरतं गात गीत
--- लबाड बोका
घटना एकच असते पण
अर्थ दोन असतात तीत
एकाची असते हार जी
तिच दुस-याची असते जीत
भुकेल्याच्या दातावरती
मारत नाही कोणी शित
श्रीमंताला अहेर मोठा
हीच जगाची आहे रित
सुख दुख्खाने भरलेलं आयुष्य
कोणी जगतं भीत भीत
आयुष्य तेच असतं पण
कोणी मरतं गात गीत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा